U19 World Cup News : भारतीय संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय

U19 World Cup News : भारतीय संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय
Pckhabar- अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये लढतीत भारतीय संघाने बलाढ्य
ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करत
दिमाखात फायनल गाठली आहे. भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 194 धावांत आटोपला. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये 96 धावांनी विजय नोंदवला.

वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय युवा टीम इंडियाने फायनल गाठली आहे. सलग चौथ्यांदा आणि आतापर्यंत आठव्यांदा टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो कॅप्टन यश धूल आणि उप कॅप्टन शेख राशीद या जोड गोळीने. सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यानंतर या दोघांनी संघाचा डाव सावरला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 290 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरवात निराशाजनक झाली. त्यानंतर काही अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 194 धावांत आटोपला. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये 96 धावांनी विजय नोंदवला.

दरम्यान, अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये अतिंम सामन्यात भारतीय संघाचा इंग्लंड संघाशी शनिवारी मुकाबला होणार आहे. या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.