Pimpri Crime News : खंडणी प्रकरण; भाजपचे माजी उपमहापौर, नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
Pckhabar- कापड व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक, कामगार नेते केशव घोळवे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी मोहम्मद तय्यब अली शेख (वय-45, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भाजपचे नगरसेवक घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत कपड्याचे नेपाळी मार्केट आहे. मार्केटची जागा मेट्रो प्रकल्पात जाणार आहे. या जागेला पर्यायी जागा म्हणून व्यापाऱ्यांना 100 गाळे मिळणार आहेत. त्यानंतरही आरोपींनी संगनमत करून 2019 पासून फिर्यादी आणि इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेमार्फत दरवर्षी 1200 रूपयांची पावती करण्यास भाग पाडले. तसेच शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी शेखकडून 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी शेखकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. शेख यांनी पैसे देण्यास विरोध केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.
पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply