Pimpri News : शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांची प्रकृती चिंताजनक

Pimpri News : शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांची प्रकृती चिंताजनक

अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Pckhabar- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मावळ लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार गजानन बाबर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बाबर यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

माजी खासदार बाबर यांच्यावर यापूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. बाबर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजताच शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. तसेच बाबर यांच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, बाबर यांच्यावर उपचार सुरू असून अशा पोस्ट व्हायरल न करण्याचे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *