Pimpri Political News : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर होताच मनसे लागली तयारीला

Pimpri Political News : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर होताच मनसे लागली तयारीला

जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याचा शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा निर्धार
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मनसेसाठी अनुकूल नसली तरी या निवडणुकीला आम्ही निर्धाराने सामोरे जाणार आहोत. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारच, असा निर्धार मनसेचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचे नकाशे मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. आता प्रभाग रचना जरी जाहीर झाली असली, तरी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्यामध्ये बदल केल्याचे जाणवत आहे. ही प्रभाग रचना मनसेसाठी अनुकूल नसली तरी मनसे निर्धाराने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्ते आम्ही सर्वांनी जोरदार तयारी केली आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये कार्यकर्ते मनसेची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून झालेली चुकीची कामे जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मनसेकडे पर्याय म्हणून पाहत आहेत, असे चिखले यांनी म्हटले आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रभाग रचना जाहीर होण्याची प्रतीक्षा होती. आता प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या नवीन 46 प्रभागामध्ये मनसेचा उमेदवार असतील. सर्व प्रभागातून निवडणूक लढवून मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मनापासून काम करायचे आहे, असा निश्चय चिखले यांनी केला आहे.

मंगळवारी कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत प्रभारी किशोर शिंदे , गणेश आप्पा सातपुते , व रणजीत शिरोळे व सर्व सदस्य उपस्थित होते. पिंपरी पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *