Sports News: भारताच्या धाकड गर्लचा अमेरिकेमध्ये झेंडा; फ्री स्टाईल कुस्तीमध्ये रितिका काकडे प्रथम
Pckhabar- बारामती तालुक्यातील निंबुत गावचे व सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेमध्ये स्थायिक असणारे श्री राहुल रत्नसिंह काकडे यांची कन्या कुमारी रितिका राहुल काकडे हिने वॉशिंग्टन येथे झालेल्या 14 वर्ष वयोगटात 65 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
निंबुत येथील राहुल रत्नसिंह काकडे कामानिमित्ताने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे चार वर्षांपासून वास्तव्य करत आहेत.
दि. २९ जानेवारी रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत 14वर्ष वयोगटात 65 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून वॉशिंग्टन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
एका भारतीय मुलीने अमेरिका मध्ये जाऊन मैदान गाजवणे हे आपल्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. कुमारी ऋतिका हिला अनेक खेळांची आवड आहे. अभ्यासातही हुशार आहे, सामाजिक कार्यात हिरीरीने भाग येते, गेली चार वर्षे ते अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत. कुमारी रितिका हिचे सर्व स्तरांमधून खूप कौतुक होत आहे. पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.










Leave a Reply