Pimpri Election News : तळवडे प्रभाग सर्वाधिक लोकसंख्येचा ; सांगवीत चार सदस्यीय शेवटचा प्रभाग!
प्रभागाची किमान लोकसंख्या ३२ हजार, तर कमाल लोकसंख्या ४० हजार
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज (मंगळवार) जाहीर होणार आहे. तळवडे येथून प्रभागाला सुरुवात होणार असून, शेवटचा प्रभाग सांगवी असेल. १३९ नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे ४५, तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हा प्रभाग सांगवीचा असेल. प्रभागाची किमान लोकसंख्या ३२ हजार, तर कमाल लोकसंख्या ४० हजार अशी आहे. अनुसूचित जातीसाठी २२ तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.
त्यातील ४५ प्रभाग तीन नगरसेवकांचे, तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल, प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या खुणा निश्चित केल्या जाणार आहेत. हा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यामध्ये ५० वेळा सुधारणा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ असेल. २९. १९, २०, २२, ४३, ११, ३७, १८, २९, ३४, १६, ३५, १७,४४, ३९, ३२, ४६, ४१, १४, २५, ३८, ३३ हे २२ प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सद्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४१, ५ आणि ६ हे आरक्षित असतील, ते दिघी, भोसरी आणि पिंपळे गुरव असे असतील.
प्रभागाची किमान लोकसंख्या ३२ हजार तर कमाल लोकसंख्या ४० हजार अशी आहे. सर्वांत कमी लोकसंख्या प्रभाग ३७ ची असून, ती ३२ हजार ६६४ अशी आहे, तर सर्वाधिक लोकसंख्या तळवडे प्रभागाची असून, तो ४० हजार ७६७ अशी आहे, तसेच चार सदस्यीय प्रभाग असलेल्या सांगवीतील लोकसंख्या ४६ हजार ९७९ अशी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चारवेळा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला. महापालिकेची नगरसेवक संख्या ११ ने वाढत ती १३९ झाली. या प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल? त्याला कोणता भाग जोडला असेल? कोणता भाग वगळला असेल? याबाबत कमालीची उत्कंठा आहे. राजकीय क्षेत्रासह सर्वत्रच प्रारूप आराखडयाचीच चर्चा होत आहे.
लोकसंख्या (२०११) १७ लाख २७ हजार ६९२
अनुसूचित जातीची लोकसंख्या दोन लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के). :
अनुसूचित जातीसाठी आरक्षण १६ टक्के: एकूण २२ जागा (पैकी ११ महिला). ●अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग २९, १९, २०, २२, ४३, ११, ३७, १८, २९, ३४,१६,३५, १७,४४, ३९, ३२, ४६, ४१, १४, २५, ३८, ३३.
●अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३६५३५ (२.११ टक्के). अनुसूचित जमातीसाठी आरक्षण ३ टक्के: ३ जागा (पैकी २ महिला).
महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली.
सध्या शहरात ३२ प्रभाग आहेत. आता तीनसदस्यीय पद्धतीनुसार ४६ प्रभाग होतील.
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग ४१, ५ आणि ६.
● सर्वसाधारण प्रभाग: ११४ (पैकी ५७ महिला). एकूण नगरसेवक: १३९










Leave a Reply