Bhosari News : इंद्रायणी प्रतिष्ठानतर्फे इंद्रायणीनगरमध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात
– शिवांजली सखी मंचच्या पूजा लांडगे, निलम लांडगे यांचा पुढाकार
Pckhabar- आमदार महेश लांडगे यांच्या सौभाग्यवती आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे आणि इंद्रायणी प्रतिष्ठानच्या नीलम लांडगे यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सौभाग्याचं लेणं असलेल्या हळदी कुंकू समारंभात भोसरी आणि परिसरातील महिला सहभागी झाल्या.
भोसरी- इंद्रायणीनगर येथील शिवराय स्पोर्ट्स ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडला. महिलांसाठी सौभाग्याचं खरं लेणं म्हणजे हळदी-कुंकू. म्हणूनच आपल्या सौभाग्यासाठी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने महिला हा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत असतात.
इंद्रायणीनगर परिसरातील माता-भगिणींसाठी इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे आणि निलम शिवराज लांडगे यांच्या पुढाकाराने हा स्नेहसोहळा आयोजित करण्यात आला.










Leave a Reply