Pimpri News : महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त नवमहाराष्ट्र विद्यालयात ऑनलाईन सभेचे आयोजन
Pckhabar- महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, त्यांची विचारसरणी नव्या पिढीमध्ये रुजावी यासाठी नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी केले.
ओमकार चव्हाण, आप्पासाहेब काशिद, श्रेयस सूर्यवंशी, अजय तेलंगे, शिवाजी बधाले या ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी यावेळी महात्मा गांधींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.
उपशिक्षिका निता अडसरे यांनी आपल्या भाषणामध्ये गांधीजींच्या गुणग्राहकते विषयी विविध उदाहरणे सांगितली. पर्यवेक्षक शरद परदेशी यांनी गांधीच्या विचारसरणीतील विविध पैलू विषयी माहिती दिली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी उपमुख्याध्यापक पी. एम.शेख व सर्व शिक्षकवृंद ऑनलाइन उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार पर्यवेक्षिका शुंभागी गमे यांनी मानले.
गांधीजीचे विचार पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे हाच आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होय असे मत प्राचार्य उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.










Leave a Reply