Pune District News : ‘त्या’ भूमिकेसंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांचा आत्मक्लेश आणि दिलगिरी

Pune District News : ‘त्या’ भूमिकेसंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांचा आत्मक्लेश आणि दिलगिरी

Pckhabar- महात्मा गांधींच्या हत्येचे मी कधीही समर्थन केलेले नाही, करणारही नाही. त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली, अशा भावना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) व्यक्त केली.

खासदार कोल्हे यांनी नथुराम गोडसेची एका चित्रपटात साकारली आहे. यामुळे खासदार कोल्हे यांच्यावर चौफेर टीका होत होती. याच पार्श्वभूमीवर खासदार कोल्हे यांनी आज महात्मा गांधींच्या आळंदी येथील स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश केला.

खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले” चित्रपटात नथुरामची भूमिका केली, पण त्या विचारधारेचे मी कदापि समर्थन करणार नाही. अशा क्षुल्लक गोष्टीने महात्मा गांधींचे विचार कधीही पुसले जाणार नाही.”

या निमित्ताने आजच्या तरुणाईमध्ये महात्मा गांधींबद्दल असलेली आस्था, निष्ठा बघून मला खूपच आनंद झाला. महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्वच यातून सिद्ध होते. सत्य, अहिंसा आणि क्षमाशीलतेचा त्यांनी जगाला दिलेला विचार संपूर्ण मानवजातीसाठी मोलाचा आहे. मीही त्या विचारांचा पाईक असल्याचे खासदार कोल्हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *