Dehu News : देहू राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या क्षेत्र देहू येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच श्री क्षेत्र देहू नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी आमदार सुनील शेळके, देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके म्हणाले”देहू नगरपंचायत निवडणुकीत मिळालेले यश हे सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे. देहूकरांनी राष्ट्रवादीवर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आमची आहे.पुढील काळात नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यास प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असू व जनसंपर्क कार्यालय देखील कार्यरत असेल,असा विश्वास आमदार शेळके यांनी देहुतील जनतेला दिला.”
दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीत उत्तम लढत देणाऱ्या परंतु थोडक्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या उमेदवारांचा सन्मान केला.










Leave a Reply