Dehugaon News : आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे उद्या देहूत स्नेह मेळाव्याचे आयोजन
Pckhabar- नगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे उद्या (रविवार) देहूगावात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
देहू येथील अभंग मंगल कार्यालयात उद्या सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे.
याबाबत आमदार निलेश लंके म्हणाले” पाच वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी देहू येथे माझ्या अत्यंत जवळच्या जिवा-भावाच्या सहकाऱ्यांसोबत मी या पावन भूमीत बैठक घेतली होती. यावेळी कोणते राजकीय निर्णय घ्यायचे व राजकिय दिशा कशी असावी या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत जे निर्णय घेतले गेले ते माझ्या राजकीय जीवनात यशस्वी ठरले. भूमिका आव्हानात्मक होती त्यावर मात केली. म्हणून या भूमीत माझी व माझ्या सहकाऱ्यांची श्रध्दा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी निलेश लंके प्रतिष्ठान,स्नेह मेळावा आयोजित करत असतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी 5 व्या मेळाव्याचे उद्या आयोजन करण्यात आले आहे.”










Leave a Reply