Election Big News : महापालिका निवडणूकीचे पडघम; 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होणार
1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती- सूचना
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्याची सुचना निवडणूक आयोगाने केली आहे. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी आदेश काढला आहे. अगोदर प्रारूप आराखडा जाहीर होणार असून, त्यानंतर आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूका किमान एक ते दीड महिना पुढे जाणार आहेत. 13 मार्च रोजी लोकप्रतिनिधींची मुदत संपणार असल्याने महापालिकेवर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता आहे.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. सर्वोच्च घेतला न्यायालयात ओबीसी आरक्षणावरून सुनावणी सुरू आहे. त्यावर अंतिम सूचना निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक न घेण्याची भूमिका राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतली आहे. त्यानंतरही निवडणूक आयोगाने आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न मागे ठेवून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अपेक्षित प्रभागांचा प्रारूप आराखडा 1 फेब्रुवारीला जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आराखड्यावर नागरिकांना 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकती 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी हरकतींवर सुनावणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका
प्रारूप आराखडा प्रसिद्धी 1 फेब्रुवारी
प्रभागावर हरकती-सूचना 1 ते 14 फेब्रुवारी
हरकतींवर सुनावणी 26 फेब्रुवारी










Leave a Reply