Talegaon Dabhade Crime News : छेडछाडीची तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर हल्ला; आरोपी गजाआड

Talegaon Dabhade Crime News : छेडछाडीची तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर हल्ला; आरोपी गजाआड

Pckhabar- पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास बाजार गल्ली रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी सतरा वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम विनोद शेळके (वय 20, रा. यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सतरा वर्षीय मुलीने आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात छेडछाडीची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या रागातून शेळके याने ‘मी तुला जिवंत सोडत नाही तुला खल्लास करतो,’ असे म्हणत हातोड्याने फिर्यादीच्या डोक्यात अनेक घाव घालून गंभीर जखमी केले.

फौजदार झोल अधिक तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *