Dehugaon News : जाधव कुटुंबाने कन्येचा पहिला वाढदिवस अनाथ मुलांबरोबर केला साजरा

Dehugaon News : जाधव कुटुंबाने कन्येचा पहिला वाढदिवस अनाथ मुलांबरोबर केला साजरा

Pckhabar- श्रीक्षेत्र देहू परिसरातील चिंचोली गावातील श्री. प्रसन्न जाधव व सौ. मनाली जाधव यांची कन्या कु. मुद्रा प्रसन्न जाधव हिचा पहिला वाढदिवस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिरगाव येथिल दिव्यांग व अनाथ मुलांच्या ‘माई बालभवन संस्था’ या ठिकाणी साजरा करण्यात आला.

‘जीवनातील हा एक खुप वेगळा अनुभव होता. आपल्या जीवनातील आनंद आशा संस्थेमध्ये आपण साजरा केला तर निश्चितपणे अनेकांच्या जीवनातील आनंद आपण द्विगुणीत करू शकतो… याचा अनुभव जीवनाला समाधान देणारा होता. जीवनामध्ये अनेक अडचणी, संकटे असूनही ही मुलं कशा पद्धतीने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात हे जवळून पाहिलं की आपण कसे जगले पाहिजे हे शिकायला मिळतं… जीवन कसे जगले पाहिजे हे शिकता येतं… असा वाढदिवस प्रत्येक कुटुंबाने अशा पद्धतीने केला तर निश्चितपणे एक वेगळा आदर्श व समाजातील गरजू घटकांना सहकार्य होत असते.’ अशी भावना मुद्राचे आजी व आजोबा सौ. शोभा राजेंद्र बुचडे (माजी ग्रामपंचायत सदस्या, देहू) व श्री. राजेंद्र मारुतराव बुचडे यांची होती.

आजी व आजोबांचे या इच्छेप्रमाणे आम्ही आमच्या लेकीचा पहिला वाढदिवस माई बालभवन संस्थेत साजरा केला असे सौ.मनाली जाधव व श्री. प्रसन्न जाधव यांनी सांगितले व भविष्यात देखील हीच सामाजिक बांधिलकीची जोपासना आम्ही पती-पत्नी करू अशी इच्छा देखील व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *