Chikhali News : चिखलीत शिवसेना प्रमुखांना अभिवादन

Chikhali News : चिखलीत शिवसेना प्रमुखांना अभिवादन

Pckhabar- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चिखली -साने चौक येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद, शहर संघटक रावसाहेब थोरात, युवा सेनेचे राहूल भोसले, सचिन सानप, संजय गाढवे, आबा भोसले, दादाराव ठाकरे, हरिभाऊ लोहकरे, सुखदेव देवकर, विजय शिवपुजे, अशोक गायकवाड यांच्यासह मोरेवस्ती परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या शिकवणुकीनुसार सामाजिक कार्य करण्यावर भर देण्याचा मनोदय व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *