Chikhali News : शिवसेना महिला आघाडीतर्फे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
Pckhabar- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चिखली -नेवाळे वस्ती येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना पर्स आणि गुळाची ढेप भेट देण्यात आली.
शिवसेना महिला आघाडीच्या साधना काशिद यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अर्चना गाटे, तुलसी सांगडे, निर्मला सांगडे, सुजाता तांबे, सीमा कोरेकर, मेघा कदम, भाग्यश्री बनसोडे, सविता काशिद, आशा जाधव, माया वाघमारे, अनिता तळेकर आणि मंजुश्री देशमाने आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांना पर्स आणि गुळाची ढेप भेट स्वरूपात देण्यात आली.










Leave a Reply