Akurdi News : आकुर्डीत शिवसेना दिनदर्शिकेचे प्रकाशन
Pckhabar-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना यमुनागर विभागप्रमुख सतीश मरळ यांनी तयार केलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना संपर्कप्रमुख वैभव थोरात, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस शुभम दिघे आदींच्या हस्ते करण्यात आले.
आकुर्डी येथील शिवसेना भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा सेने शहर अधिकारी विश्वजीत बारणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, पांडुरंग पाटील, शहर संघटक संतोष सौंदणकर, भाविक देशमुख, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, राजेंद्र पालांडे, सुनील पालकर आदी उपस्थित होते.










Leave a Reply