Bhosari News : कविता भोंगाळे युवा मंचने उभारलेली माणुसकीची भिंत देतेय अनेकांना मायेची ऊब

Bhosari News : कविता भोंगाळे युवा मंचने उभारलेली माणुसकीची भिंत देतेय अनेकांना मायेची ऊब
– कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते उदघाटन
– कविता भोंगाळे यांच्या समाजोपयोगी उपक्रमात अनेकांची साथ
Pckhabar-दिघी, भोसरी परिसरातील गरीब निराधार गरजूंसाठी कविताताई भोंगाळे युवा मंचच्या माध्यमातून ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रम राबवला जात आहे. एक भिंत उभारण्यात आली असून तिथे अनेक दानशूर हात उबदार कपडे आवश्यक साहित्य देत आहेत. ही माणुसकीची भिंत अनेकांना मायेची ऊब देणारी ठरत आहे.

माणुसकीच्या भिंतचा शुभारंभ कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमृत पराड, विदर्भ मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ तांदळे, भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र नांदोळकर, युवा नेते योगेश भोंगाळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भुजबळ, गणेश गवळी, विजय तापकीर, संदीप पंडित, वासुदेव अवसरमोल, सुभाष बालदोटा, अरुण इंगळे, श्रीकृष्ण अत्तारकर, ओंकार काटवले, मनीषा गंगणे, ज्योती राठोड, विवेक तिव्हाने, प्रदीप तायडे, पवार, रुपाली सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सर्वत्र कडाक्याची थंडी असून समाजातील निराधार लोकांचा बचाव व्हावा या सामाजिक भावनेतून ही माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. नागरिक देखील या उपक्रमात सहभाग घेत आहेत. अनेकजण जुने कपडे, स्वेटर असे साहित्य या भिंतीवर आणून देत आहेत.

यावेळी बोलताना सचिन लांडगे म्हणाले, “कविता भोंगाळे यांचे सामाजिक उपक्रम सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी आदर्शवत असतात. या माणुसकीच्या भिंतीचा परिसरातील निराधार लोकांना मोठा आधार मिळेल. कविता भोंगाळे यांनी  प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत सर्वसामान्यांची सेवा करत राहावे.”

नगरसेवक सागर गवळी, विनायक भोंगाळे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. भाजपा पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीस कविता भोंगाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *