Pimpri News: रयतेचा आधारवड स्वर्गीय प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांना रयतच्या पिंपरी संकुलातर्फे श्रध्दाजंली

Pimpri News: रयतेचा आधारवड स्वर्गीय प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांना रयतच्या पिंपरी संकुलातर्फे श्रध्दाजंली

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्यु. कॉलेज, कन्या विद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा. डॉ. एन.डी.पाटील सर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आज (सोमवार) महात्मा फुले महाविद्यालया च्या सभागृहा मध्ये offline व online शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य संजोग वाघेरे होते. तसेच नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन भाऊसाहेब वाघेरे ,कन्या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य हनुमंतराव नेवाळे हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपशिक्षिका मनिषा निकम , प्रा. शंकर पाटील सर, निता शेटे, प्राध्यापक विद्यासागर वाघेरे या शिक्षकानी श्रद्धांजली अर्पण केली. तर महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य शहाजी मोरे व प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पितृतुल्य व्यक्तीमत्व हरपल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

लोकयोद्धा, रयतेचा आधारवड , अंधश्रध्देचे निर्मुलन करणारे नेते तसेच पिंपरी रयत संकुलासाठी त्यांनी दिलेले योगदान यावेळी बऱ्याच वक्त्यांनी नमूद केले.  कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी दिलेले योगदान व त्यांचा परखड स्पष्टवक्तेपणा नमूद केला. त्यावेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजन कटिबद्ध आहोत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत प्राचार्य उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.

हनुमंतराव नेवाळे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना जुन्या स्मृतीना उजाळा दिला. संजोग वाघेरे पाटील यांनी online आपला शोकसंदेश व्यक्त केला.   तसेच  स्कूल कमिटी सदस्य त्याचे ,  कुटुंबिय , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पिंपरी संकुलाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नवमहाराष्ट्र विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पी.एम. शेख, पर्यवेक्षक शरद परदेशी, पर्यवेक्षिका शुंभागी गमे व तीनही प्रशालेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

सूत्रसंचालन  निता शेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *