Pimpri Corona News :  कोरोना रुग्ण संख्या घटली ;  2 हजार 947 नवे रुग्ण

Pimpri Corona News :  कोरोना रुग्ण संख्या घटली ;  2 हजार 947 नवे रुग्ण

2 हजार 367 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आज (सोमवार) काही प्रमाणात कमी झाली आहे.  आज 2 हजार 947 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 367 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील  दोन तर हद्दीबाहेरील एका रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 542 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 30 हजार 497 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 28 हजार 166 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 27 हजार 557 रुग्ण गृहविलगीकरणात असून 609 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत 32 लाख 35 हजार 165  जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *