Dehu Social News : गोशाळेला अभंग प्रतिष्ठानतर्फे कुट्टी मशीन भेट

Dehu Social News : गोशाळेला अभंग प्रतिष्ठानतर्फे कुट्टी मशीन भेट

Pckhabar- विश्व कल्याण मानव सेवा संस्था, विठ्ठलनगर-देहू येथे गोशाळा आहे. या गोशाळेसाठी कुट्टी मशीनची आवश्यकता होती, हे लक्षात घेऊन अभंग प्रतिष्ठानच्या वतीने अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मोरे व उपाध्यक्ष सुजित मोरे यांच्या विशेष सहकार्याने शनिवारी कुट्टी मशीन देण्यात आली.

या गोशाळेत सध्या 52 गाई आहेत. यावेळी अभंग प्रतिष्ठानचे प्रा. विकास कंद सर, सागर मोरे, मा. उपसरपंच अभिजीतदादा काळोखे, मा. उपसरपंच सचिन साळुंके, सुरेश गाडे, रवींद्र काळोखे, सचिव अमित गायकवाड, तात्या मोरे, अजिंक्य साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विश्व कल्याण मानव सेवा संस्थेचे प्रमुख शिरसागर महाराज यांनी संस्थेमार्फत विशेष आभार मानण्यात आले. अभंग प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण सेवा कार्याची त्यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *