Pimpri Corona News : शहरात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढताच
4 हजार 875 नवे रुग्ण; 2 हजार 527 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज 4 हजार 875 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 538 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 23 हजार 174 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 25 हजार 837 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 25 हजार 253 रुग्ण गृहविलगीकरणात असून 584 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत 32 लाख 17 हजार 254 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply