Dehu political News :  देहू नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

Dehu political News :  देहू नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

देहुकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जनतेची सेवा करा : उपमुख्यमंत्री पवार
Pckhabar- श्री क्षेत्र देहू नगरपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित 14 आणि दोन अपक्ष अशा 16 नगरसेवकांनी आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुणे येथे आज (शनिवार) भेट घेतली.

नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे.  त्यानंतर आज आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘देहुकरांनी भरभरून दिलेल्या मतदानाबद्दल  जनतेचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच देहू मधील पाणी योजना, भूमिगत गटर योजना यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा तातडीने पाठपुरावा करा. देहुकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जनतेची सेवा करा.’ अशा सुचना करत नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, देहु शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, कांतीलाल तात्या काळोखे, प्रविणतात्या झेंडे, बाळासाहेब काळोखे, विशाल परदेशी, स्वप्नील काळोखे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *