Chikhali News : चिखलीत रुग्णालयास २५ हजार रुपयांचा दंड
Pckhabar- रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकताना आढळल्याने चिखली येथील संत तुकाराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला २५ हजार रुपये दंड महापालिकेच्या पथकाने केला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे आणि आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडार यांनी ही कारवाई केली.
नागरिकांनी ओला, सुका व घातक कचरा वेगळा द्यावा. तसेच वैद्यकीय घातक कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्याने संत तुकाराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मास्क नसल्याने १०५१ जणांना दंड
कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिकेने पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या मदतीने ग्रीन मार्शल पथक नियुक्त केले आहे. त्यांनी १० ते १६ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीत एक हजार ५१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सहा लाख १८ हजार १५० रुपये दंड वसूल केला. पाच हजार ५०७ जणांचे समुपदेशन करून आणि समज देऊन सोडून दिले. एक हजार २५२ जणांना मास्कचे वाटप केले, असे महापालिकेने कळविले आहे.










Leave a Reply