Pimpri Corona News : उच्चांक.. उच्चांक… आणि उच्चांक; शहरात प्रथमच 5 हजार 182 नवे कोरोना रुग्ण

Pimpri Corona News : उच्चांक.. उच्चांक… आणि उच्चांक; शहरात प्रथमच 5 हजार 182 नवे कोरोना रुग्ण

2 हजार 566 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही एका दिवशी पाच हजार रुग्ण आत्तापर्यंत आढळले नव्हते. मात्र, आज एका दिवशी कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक गाठला आहे. आज 5 हजार 182 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 566 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 535 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 18 हजार 299 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 23 हजार 492 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 22 हजार 920 रुग्ण गृहविलगीकरणात असून 572 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत 32 लाख 8 हजार 575 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *