Pimpri Crime News: मानवाधिकार अधिकारी असल्याचे सांगून खंडणी घेतली; चार जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar- मानवाधिकार राइट अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार केली आहे, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडून रोकड घेतली, तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून प्रकरण मटविण्यासाठी आणखी ३० हजारांची मागणी केली. याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी नाशिक फाटा येथे घडली.
इम्तियाज अहमद हुसेन (वय ६३, रा. पुलगेट, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सालीम सय्यद (वय ४०), हबीब सय्यद (वय३७), हाजी गुलाम रसूल सय्यद (वय ६०), हसीना बशीर मुलानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सहाला फिर्यादी हुसेन हे घरी होते. त्यावेळी सलीमने फोन करून त्यांना हॉटेलवर बोलावले. हुसेन तेथे आले असता तेथे सलीम, हबीब आणि हाजी हे तिघेजण होते. त्यापैकी सलीम व हबीबने आपण मानवाधिकार अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्याविरोधात एका महिलेने तक्रार दिली आहे, असे आरोपींनी हुसेन यांना सांगितले. सलीमने त्यांना कारवाईची धमकी दिली. तसेच आरोपींनी अनोळखी महिलेसोबत बोलणे करून हुसेन यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांची रोकड घेतली. फौजदार पी. बी. पासलकर तपास करत आहेत.










Leave a Reply