Pimpri Corona News : कोरोना वाढतोय, नागरिकांनो काळजी घ्या; 4 हजार 94 नवे रुग्ण
2 हजार 271 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात 4 हजार 94 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवार) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 271 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत आज सर्वाधिक रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 534 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 13 हजार 117 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 20 हजार 878 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 20 हजार 302 रुग्ण गृहविलगीकरणात असून 576 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत 31 लाख 95 हजार 407 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply