Big News : 24 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Pckhabar- ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मंत्री गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.










Leave a Reply