Pimpri Corona News : धोका वाढतोय; 3 हजार 505 नवे रुग्ण

Pimpri Corona News : धोका वाढतोय; 3 हजार 505 नवे रुग्ण

2 हजार 64 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात 3 हजार 505 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवार) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 533 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 9 हजार 23 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 19 हजार 56 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 18 हजार 528 रुग्ण गृहविलगीकरणात असून 528 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत 31 लाख 94 हजार 758 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *