Dehu Election News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रसिका काळोखे यांचा विक्रमी मतांनी विजय तर प्रविण काळोखे यांचा अवघ्या 7 मतांनी विजय
Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली असून 14 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचा एक तर दोन अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मातब्बर उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक दोनच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रसिका स्वप्निल काळोखे यांचा तब्बल 552 मतांनी विजय झाला आहे. रसिका काळोखे यांना 733 तर भाजपच्या शितल मराठे यांना 188 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 14 चे उमेदवार प्रविण काळोखे यांचा अवघ्या 7 मतांनी विजय मिळाला आहे. त्यांना 318 तर अपक्ष उमेदवार
आनंदा काळोखे यांना 311 मते मिळाली.
प्रभाग 13 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका मोरे यांनीही 528 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
त्यांनी भाजपच्या अनिता मुसुडगे यांचा पराभव केला आहे. प्रभाग 10 चे उमेदवार सुधीर काळोखे यांनी 491 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या सुहास गोलांडे यांचा पराभव केला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सहाही उमेदवार साधे स्पर्धेतही येऊ शकले नाहीत. शिवसेना पक्षाने आठ उमेदवार दिले होते. यामध्ये फक्त अक्षदा कंद (214) आणि शैला खंडागळे (103)यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.










Leave a Reply