Dehu Election News: आमदार सुनिल शेळके यांचा करिष्मा कायम; भाजप, शिवसेना, काँग्रेसचा सुपडा साफ

Dehu Election News: आमदार सुनिल शेळके यांचा करिष्मा कायम; भाजप, शिवसेना, काँग्रेसचा सुपडा साफ

देहू नगरपंचायत निवडणूक:  राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, भाजप 1 तर दोन अपक्ष उमेदवार विजयी

वाचा विजयी उमेदवारांची नावे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मातब्बर उमेदवारांना पराभवाचा धक्का

Pckhabar- भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या  मावळ विधानसभा मतदारसंघात एकतर्फी विजय प्राप्त केल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांची विजयी घोडदौड आणि करिष्मा कायम आहे. आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली असून 14 उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मातब्बर उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

आमदार शेळके आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देहू नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, आमदार सुनिल शेळके यांनी भाजपसह शिवसेना आणि काँग्रेसचा अक्षरश: सुपडा साफ केला आहे.  17 जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार दणदणीत मतांनी निवडून आले आहेत. तर दोन अपक्ष आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग सात मधील उमेदवार प्रा. विकास कंद आणि
प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार माजी सरपंच रत्नमाला कारंडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे वार्ड क्र. १ मीना कुऱ्हाडे, वार्ड क्र.२ रसिका काळोखे, वार्ड क्र. ३ पूजा दिवटे, वार्ड क्र. ४ मयूर शिवशरण, वार्ड क्र. ६ पूनम काळोखे, वार्ड क्र. ९  स्मिता चव्हाण, वार्ड क्र. १० सुधीर काळोखे, वार्ड क्र. ११  पौर्णिमा परदेशी, वार्डक्र.१२ सपना जयेश मोरे, वार्ड क्र.१३ प्रियांका अभिजित मोरे, वार्ड क्र. १४ प्रवीण काळोखे, व. वार्ड क्र. १५ मधुन आदित्य टिळेकर, वार्ड क्र. १६ मधुन योगेश परंडवाल, वार्ड क्रमांक १७ ज्योती टिळेकर असे राष्ट्रवादीचे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत तर

वार्ड ५ मधुन अपक्ष उमेदवार शितल हगवणे,
वार्ड क्र.७  अपक्ष उमेदवार योगेश काळोखे,
वार्ड क्र. ८ मधुन भाजपच्या पुजा काळोखे हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *