Dehu Election News: देहू नगरपंचायतीच्या सत्तेचा फैसला थोड्याच वेळात

Dehu Election News: देहू नगरपंचायतीच्या सत्तेचा फैसला थोड्याच वेळात

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायतीसाठीच्या 17 प्रभागासाठी दोन टप्प्यात मतदान झाले होते. आज (बुधवार) सकाळी 10 वाजता
वैकुंठगमनस्थान येथील भक्त निवास येथे मतदान मोजणीला प्रारंभ झाला आहे. मतदार संख्या कमी असल्यामुळे दोन तासात सत्तेचा फैसला होणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण पुणे जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

आमदार सुनिल शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मावळ मतदारसंघात प्रथमच स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीची ही निवडणूक आहे. त्यामुळे या नगरपंचायतीवर झेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा की भारतीय जनता पक्षाचा अशी चर्चा सुरू आहे. आता निकालाकडे राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 12 वाजेपर्यंत सत्तेचा फैसला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *