Dehu Election News : देहू नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी 84.33 टक्के मतदान

Dehu Election News : देहू नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी 84.33 टक्के मतदान

उद्या मतमोजणी; राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता

Pckhabar-ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने देहू नगरपंचायतीच्या उर्वरित राहिलेल्या चार प्रभागासाठी आज (मंगळवार) मतदान सुरळीत पार पडले.
2 हजार 976 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 84.33 टक्के मतदान झाले आहे.
उद्या ( बुधवार) सकाळी 10 वाजता वैकुंठगमनस्थान येथील भक्त निवास येथे मतदान मोजणीला प्रारंभ होणार आहे.

नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागासाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झाले. तर ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11,12, 14 आणि 15 मधील खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. या प्रभागातील आज मतदान शांततेत पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला उत्साहात सुरूवात झाली. पहिल्या चार तासात 27.74 टक्के मतदान झाले होते.
त्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 52 पर्यंत गेली. साडेतीन वाजेपर्यंत 69 टक्के मतदान झाले. साडेपाच वाजेपर्यंत 84.33 टक्के मतदान झाले.

राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आहे. त्यामुळे देहू नगरपंचायत निवडणूकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती. आता उद्या ( बुधवार) लागणाऱ्या निकालाकडे राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, देहू नगरपंचायतीच्या 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 13 प्रभागासाठी 48 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे-13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तसेच आज झालेल्या चार प्रभागासाठी 18 उमेदवार नशीब आजमावत आहेत. काही प्रभागात दुरंगी, तिरंगी तर चौरंगी लढत झाली आहे.

पुरुष – 1542
स्त्री -1434
टक्के वारी – 84.33

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *