Pimpri News : प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना कन्या विद्यालयात श्रद्धांजली
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाखेत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी चेअरमन प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांना कन्या विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने आज (मंगळवार) श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विद्यालयातील उपशिक्षिका सौ अनघा रांगणेकर यांनी डॉ. एन डी पाटील साहेब यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य याविषयी माहिती देताना डॉ एन. डी .पाटील यांचा 15 जुलै 1929 रोजी ढवली, जि. सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म झाला. अतिशय मेहनतीने शिक्षण घेत त्यांनी एम ए. अर्थशास्त्र व एल एल बी. ही पदवी प्राप्त केली. पुढे छत्रपती शिवाजी कॉलेज चे प्राध्यापक , कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज चे प्राचार्य झाले त्यांचे शैक्षणिक कार्य मोठे असून त्यांनी विविध पदे देखील भूषविली आहेत. नंतर शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने हाताळून त्यांना न्याय मिळवून दिला . याविषयी माहिती दिली.
यानंतर विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ,व माजी चेअरमन, तसेच राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय चळवळीतील कणखर नेतृत्व , शेतकरी, कष्टकरी समाजाचे आधारवड असणारे जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी . पाटील साहेब यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य अतिशय उल्लेखनीय असून आज महाराष्टाने एक विचारवंत, धडाडीने कार्य करणारा मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे संपूर्ण कार्य प्रेरणादायी असून भविष्यात त्या मार्गाने चालण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करु या असे मनोगत व्यक्त केले.










Leave a Reply