Pimpri Corona News : कोरोनाचा कहर सुरुच; 3 हजार 159 नवे रुग्ण

Pimpri Corona News : कोरोनाचा कहर सुरुच; 3 हजार 159 नवे रुग्ण

1 हजार 712 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात 3 हजार 159 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवार) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 712 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 532 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 5 हजार 518 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 17 हजार 615 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 17 हजार 32 रुग्ण गृहविलगीकरणात असून 583 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत 31 लाख 85 हजार 547 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *