पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 946 नवे रूग्ण , 20 जणांचा मृत्यू , 448 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारी कोरोनाचे 946 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 32 हजारी ओलांडली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 448 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 32 हजार 565 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 853 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात गुरूवारअखेर 22 हजार 453 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 662 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 538 तर 124 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
गुरूवारी 1 हजार 897 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 1 हजार 454 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 237 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 18 हजार 578 घरांना भेटी देऊन 59 हजार 229 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
शहरातील विविध भागातील 20 जणांचा मृत्यू
काळभोरनगर (पुरुष ७६ वर्षे), नेहरुनगर (स्त्री ७० वर्षे), रहाटणी (स्त्री ५३ वर्षे, स्त्री ७५ वर्षे), खराळवाडी (पुरुष ४८ वर्षे), निगडी (पुरुष ७२ वर्षे), चिखली (पुरुष ७० वर्षे),भोसरी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ६० वर्षे), काळेवाडी (स्त्री ८५ वर्षे), चिंचवड (पुरुष ५३ वर्षे),वाल्हेकरवाडी (पुरुष ८० वर्षे), यमुनानगर (स्त्री ६९ वर्षे),लोणावळा (पुरुष ६५ वर्षे), धायरी (पुरुष ७३ वर्षे), आळंदी (पुरुष ६५ वर्षे), मुळशी (पुरुष ५० वर्षे), देहुरोड (स्त्री ६८ वर्षे), मरकळगाव (पुरुष ३६ वर्षे), जुन्नर (पुरुष ६४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.










Leave a Reply