Pune News : पवारांवर टीका, टिप्पणी करण्यापलिकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काम राहिले नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचे चंद्रकांत पाटील यांना सडेतोड उत्तर
Pckhabar- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली, आणि त्यावर नेहमीप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. पवार हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात तून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खासदार आहेत. पवार साहेबांनी ही मेट्रो ची फेरी करीत असताना त्याचं कुठले श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त पवार यांचे नाव घेऊन टीका टिप्पणी करणे या पलीकडे त्यांच्या पक्षात पाटील यांना काम राहिले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.
काकडे पुढे म्हणाले” पवार साहेबांनी संपूर्ण मेट्रो प्रकल्पाची माहिती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला मेट्रो अधिकाऱ्यांशी सविस्तरपणे चर्चा केली, काही अडचणी आहेत का याची चौकशी केली. दिल्ली मुंबई मधील काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले. त्यामुळे मेट्रो श्रेय घेण्याचा पवार साहेबांचा कुठलाही प्रयत्न नाही किंबहुना त्यांना त्याची गरजही नाही.
ही मेट्रो पाच वर्षे कोणत्या पक्षाच्या खासदारामुळे प्रलंबित राहिली याचा शोध चंद्रकांत पाटलांनी घ्यावा,अर्थात ते घेतील असं मला वाटत नाही, फक्त पवार यांचे नाव घेऊन टीका टिप्पणी करणे या पलीकडे त्यांच्या पक्षात त्यांना काम राहिले नसल्याचे अंकुश काकडे म्हणाले.”










Leave a Reply