Bhosari News: कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या अटीवर महाविद्यालये व शाळा त्वरीत सुरु करण्याची परवानगी द्यावी : प्रा अशोककुमार पगारिया

Bhosari News: कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या अटीवर महाविद्यालये व शाळा त्वरीत सुरु करण्याची परवानगी द्यावी : प्रा अशोककुमार पगारिया

Pckhabar- कोरोनाच्या कालावधीत जवळ जवळ दिड वर्षे बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये नुकतीच सुरु झाली होती . विद्यार्थीं आणि अध्यापक वर्ग यांच्यात उत्साह होता . अध्यापनाचे काम सुरळीत पणे सुरु झाले होते ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन शाळा कॉलेजमधे विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली होती यातच पुन्हा शाळा कॉलेजेस बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करतानाच ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी आहे अशा ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या अटींवर शाळा व कॉलेजेस त्वरित सुरु करून विद्यार्थ्यंचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे आणि संस्थाचालक आणि प्राध्यापकवर्ग यांच्याही मनःस्थितीचा विचार करावा असे आवाहन मा. मुख्यमंत्री महोदयांना , भगवान महावीर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . अशोककुमार पगारिया यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *