विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘हे’ पाच जण इच्छुक, अजितदादा कोणाला देणार संधी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा एका वर्षाचा कार्यकाल संपल्याने विरोधी पक्षनेता बदलण्यात येत आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे इच्छुक आहेत. त्यांनी हे पद मिळावे यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे ही नावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकाअधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नाना काटे यांचा कार्यकाल संपल्याने अजित पवार यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी इच्छूक नगरसेवकांची नावे मागविली होती. त्यामध्ये पाच नगरसेवकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. त्यात महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे यांचा समावेश आहे. दरम्यान, यामध्ये गव्हाणे, मिसाळ, घोडेकर यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. या पाचपैकी अजितदादा कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले होते. त्यात पाच नगरसेवकांनी अर्ज केले आहेत. हे अर्ज अजितदादांकडे पाठविले जाणार आहेत. नगरसेवकांची बैठक घेऊन दादांच्या सूचनेनुसार नवीन विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित केले जाईल.










Leave a Reply