Pimple Gurav News : महेश मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिरात 139 जणांचे रक्तदान
Pckhabar-दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसर महेश मंडळा तर्फे कै.चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ २४ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन पिंपळे गुरव येथील निळुफुले नाट्यगृह येथे करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन सौ लीलाबाई गुगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप गुगळे, सतीश लोहिया, नगरसेविका शारदा सोनवणे, पंकज पंपालिया, श्याम झंवर आदी उपस्थित होते .
सद्य स्थितीत शहरात रक्तपेढ्या मध्ये असलेली रक्ताची टंचाई व कोरोनामुळे रक्त संकलन करण्यात येणाऱ्या अडचणीच्या पार्शवभूमीवर या रक्तदान शिबिरात 139 रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी अक्षय रक्तपेढ़ीने सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल , मनोज अटल , गजानंद बिहाणी ,तुषार माहेश्वरी , दीपेश मालानी यांनी सहकार्य केले.










Leave a Reply