Pimpri Corona News : शहरात आज नवीन 2 हजार 626 रुग्ण; 1 हजार 535 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona News : शहरात आज नवीन 2 हजार 626 रुग्ण; 1 हजार 535 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात 2 हजार 626 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 535 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 530 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 99 हजार 994 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 15 हजार 76 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 14हजार 509 रुग्ण गृहविलगीकरणात असून 567 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत 31 लाख 67 हजार 671 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *