Sports News : विराट कोहलीचे धक्कातंत्र; कोहलीने दिला कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा
Pckhabar- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही वेळापूर्वी कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. सात वर्षांच्या नेतृत्वानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कोहलीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोहलीने यापूर्वीच 20-20 क्रिकेट कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोहलीची वनडे कर्णधार पदावरून उचलबांगडी केली होती. त्याच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोहलीने कसोटीचा कर्णधार पदाचा राजीनामा दिला की काय?अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला आहे.










Leave a Reply