Pimpri Corona News : शहरात आज नवीन 2 हजार 545 रुग्ण; 1 हजार 73 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात 2 हजार 545 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 73 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
शहरातील 2 लाख 97 हजार 368 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 13 हजार 986 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 13 हजार 490 रुग्ण गृहविलगीकरणात असून 496 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत 31 लाख 55 हजार 725 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply