Pimpri News : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात 67 हजार 276 नव मतदारांची वाढ
Pckhabar- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या ३ विधानसभा मतदारसंघात नव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघात एकूण ६७ हजार २७६ मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १४ लाख ३२ हजार ३४० झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या डिसेंबर २०२१ या कालावधीत राबविले. त्यात विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक झालेल्या युवक आणि युवकांसाठी तसेच नव्याने राहण्यास आलेल्या नागरिकांची मतदान नोंदणी प्रक्रिया राबविली. त्यानुसार नवमतदारांच्या मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मतदार वाढले आहेत. तर, अपुऱ्या कागदपत्रांमुळे काही जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
मतदान नोंदणी अभियानापूर्वी या तीनही मतदारसंघात एकूण १३ लाख ६५ हजार ६४ मतदार होते. ३५ दिवसांच्या नोंदणी अभियानात ती संख्या ६७ हजार ३४० ने वाढून १४ लाख ३२ हजार ३४० झाली आहे. सर्वाधिक ३० हजार २० मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात वाढले आहेत. या मतदारांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्या निवडणुकीच्या वेळी पिंपरी-चिंचवड शहराची एकूण मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार ५९ होती. गेल्या पाच वर्षांत एकूण २ लाख
४० हजार २८१ मतदार वाढले आहेत.
पिंपरी मतदारसंघ- ३ लाख ६८ हजार ८०२
चिंचवड मतदारसंघ- ५ लाख ६४ हजार ९९५
भोसरी मतदारसंघ- ४ लाख ९८ हजार ५४३
एकूण मतदार संख्या- १४ लाख ३२ हजार ३४०










Leave a Reply