Chinchwad News : मास्क न वापरणाऱ्यांवर ग्रीन मार्शल भरारी पथकाकडून कारवाई

Chinchwad News : मास्क न वापरणाऱ्यांवर ग्रीन मार्शल भरारी पथकाकडून कारवाई

Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्या ५९ जणांवर तसेच प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्या १६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.

पर्यावरणाच्या रक्षणाकरिता तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रीन मार्शल या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये आरोग्य निरीक्षक, कारकून, आरोग्य सहायक, एम. एस. एफ. जवान (सुरक्षा रक्षक) यांची नेमणूक करण्यात आली आहे. १० ते १२ जानेवारीदरम्यान या पथकाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५९ विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच अस्वच्छता करणाऱ्या प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्या १६ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या दोन्ही कारवाईमध्ये ग्रीन मार्शलकडून ३८ हजार २० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच यापुढील काळातही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *