Pimpri News : शहरात १५ ते १८ वयोगटातील ३२ हजार ६७९ मुलांचे लसीकरण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या शहरातील १ लाख १६ हजार ७०० मुलांपैकी ३२ हजार ६७९ जणांनी गुरूवार अखेर लस घेतली आहे. महापालिकेने शहरात ३ जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या एका केंद्रावर किमान ५०० डोस उपलब्ध आहेत. त्यावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियंत्रण आहे. कोविन ॲपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून ५० टक्के लसीचे डोस दिले जाणार आहेत.
वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुले लसीकरण केंद्रावर येऊन लस घेत आहेत. शहरातील १ लाख १६ हजार ७०० मुले-मुली लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी ३२ हजार ६७९ जणांनी मागील ११ दिवसात लस घेतली आहे. ८४ हजार २१ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्र सुरू आहेत. पात्र मुलांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले आहे.










Leave a Reply