Chinchwad News : ज्येष्ठ नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेऊन महापालिकेच्या लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे: महापौर माई ढोरे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जेष्ठ नागरीकांसाठी कोविड-१९ प्रिकॉशन डोस देणेत येत आहेत. जेष्ठ नागरीकांनी प्रिकॉशन डोस घेऊन महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
आज सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेमध्ये जेष्ठ नागरिकांना महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत कोविड-१९ प्रिकॉशन डोस देणेत आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
या लसीकरण प्रसंगी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. विजया आंबेडकर आणि जेष्ठ नागरिक संघाचे अरुण बागडे, वृषाली मरळ, मधुकर कसबेकर, शांताराम सातव, ईश्वर चौधरी आणि बंडोपंत शेळके उपस्थित होते.










Leave a Reply