Pimpri News : उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप; आयुक्तांचे धक्कातंत्र

Pimpri News : उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप; आयुक्तांचे धक्कातंत्र

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे अचानक फेरवाटप करून अधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. याबाबत आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढला आहे.

उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडील प्रशासन विभाग काढून उद्यान विभागाची जबाबदारी ठेवली आहे. उपायुक्त स्मिता झगडे यांचे महत्त्व कमी केले आहे. त्यांच्याकडील करसंकलन व कर आकारणी विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडे एलबीटी आणि पशु वैद्यकीय विभाग सोपविला आहे. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे निवडणूक विभाग, दक्षता समितीचा प्रशासकीय कार्यभार कायम ठेवत प्रशासनाचा अतिरिक्त पदभार दिला. सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह परवाना विभागासह करसंकलन या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी पदाची जबाबदारी असणार आहे. सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडील प्रशासन काढून केवळ ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार ठेवला आहे. तर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडील जनता संपर्क विभागाची जबाबदारी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाने यांच्याकडे सोपविली आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी या फेरबदलाबाबतचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *