Pimpri Corona News : कोरोना रुग्ण संख्येचा कहर; आज 2 हजार 65 नवे रुग्ण; 591 रुग्णांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (बुधवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 2 हजार 65 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. 591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 89 हजार 984 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 9 हजार 486 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 9 हजार 32 रुग्ण गृहविलगीकरणात असून 454 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 31 लाख 28 हजार 906 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply