Chinchwad News : सांगवीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
Pckhabar-सांगवी परिसर महेश मंडळ (चॅरिटेबल संस्था)यांच्या वतीने कै. चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ रविवार (दि.16) रोजी 24 व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Donate Blood & Save Life या टॅगलाईन खाली सांगवी परिसर महेश मंडळाने आतापर्यंत 23 रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले आहे. यावर्षीही 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत नवी सांगवीतील कृष्णाबाजार चौकातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निळु फुले नाट्यगृह बहुउद्देशिय हॉलमध्ये हे शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी
९८२३१३८८६७, ८६६८४८०६२७, ९८५०३४१४०१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया यांनी केले आहे.
तसेच रक्तदाता, मित्र किंवा नातेवाईकांसाठी गरज पडल्यास मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही लोहिया यांनी सांगितले.










Leave a Reply